जो बायडन यांचा खळबळजनक दावा, म्हणाले ‘भारतामुळेच…’ 

नवी दिल्ली | इस्रायलची लढाऊ विमाने हमासवर सातत्यानं बॉम्बफेक करत आहेत. या युद्धात आतापर्यंत 6 हजार जणांचा बळी गेलाय. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी धक्कादायक दावा केला आहे.

हमास आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धासाठी जो बायडन यांनी भारताच्या ड्रीम प्रोडेक्टला जबाबदार धरलंय. हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला करण्याचे एक कारण म्हणजे नवी दिल्लीतील G-20 परिषदेदरम्यान महत्त्वाकांक्षी भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरची अलीकडेच केलेली घोषणा आहे, असं जो बायडन यांनी म्हटलं आहे.

जो बायडन यांनी पहिल्यांदाच नव्हे तर मागील आठवड्यात देखील असंच वक्तव्य केलं होतं. माझ्याकडे याबाबत कोणताच ठोस पुरावा नसल्याचं जो बायडन यांनी बोलून दाखवलं आहे. 

 दरम्यान, इस्रायल-हमासच्या युद्धाला (Israel Hamas War) आज 20 वा दिवस उजाडलाय. हमास इस्रायल युद्धात हजारो नागरिकांचा बळी गेलाय. 11 कोटी 4 लाख नागरिक स्थलांतरीत झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रानं दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-