मुंबई | प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या घरावर हल्ला झाला आहे. यानंतर सदावर्ते आक्रमक झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतानाच प्रचंड संतापही व्यक्त केला आहे.
गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या 16मजली इमारतीत राहतात. या इमारतीबाहेर असलेल्या पार्किंगमध्ये त्यांच्या दोन गाड्या उभ्या होत्या. मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्यामुळे यापूर्वीच गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र तरीही गुरुवारी सकाळी काहीजणांनी गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अलिशान गाडीच्या काचा फोडल्या.
गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या गाडीच्या तोडफोडप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना जबाबदार ठरवत त्यांना तातडीने अटक करा, त्यांच्या मुसक्या बांधा, अशी मागणी केली. 20 पोलीस असताना मनोज जरांगे समर्थक माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. मनोज जरांगे पाणी पितात, सलाईन लावून घेतात, असं उपोषण होतं का?, असा बोचरा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी विचारला.
मराठा आरक्षण हा निव्वळ फार्स आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणे अशक्य आहे, असंही गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-