मोदींच्या सभेला जायला लोकांचा नकार; ग्रामस्थांनी बस परत पाठवली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

अहमदनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शिर्डी येथे दौरा असणार आहे. शिर्डी येथे काही ठिकाणी मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. मोदींच्या आगमनासाठी शिर्डीमध्ये जोरदार तयारी केली आहे. त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नगर येथील ग्रामस्थांना बसचं नियोजन करून देण्यात आलेलं. दरम्यान या बस रिकाम्याच परत पाठवण्यात आल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली.

काय आहे नेमकं प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ग्रामस्थांना आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय गावातील नागरिकांना बस पाठवल्या होत्या मात्र या बस पुन्हा गावकऱ्यांनी रिकाम्या पाठल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आक्रमक होत या ग्रामस्थांनी बसेस रिकाम्या पाठवल्याचं सांगितलं जात आहे.

मठाचीवाडी येथील ग्रामस्थांसाठी ही सोय केली होती. मात्र मराठा आरक्षणाबाबत गावकरी आक्रमक झाल्याने त्यांनी या सभेला जाण्यासाठी पाठ फिरवली आहे. या गावात पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच विखे कुटुंबीयांविरोधात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचा फटका मोदी यांच्या सभेला बसताना दिसत आहे.

नरेेंद्र मोदी यांच्या सभेत मराठा आरक्षणाबद्दल संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आणि शिवसेना (ठाकरे गट) (Shivsena UBT) कार्यकर्ते भूमिका विचारतील. जर मोदी यांनी आरक्षणाबाबात काही भूमिका मांडली नाही तर मात्र सर्वजण एकाच वेळी उभे राहून जाब विचारतील.

थोडक्यात बातम्या –