ललित पाटील ड्रग्स प्रकरण धक्कादायक वळणावर!

पुणे | पुण्याच्या ससून (Sassoon Hospital) रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज (Drugs) माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. मागच्या काही दिवसांपूर्वी ललितला बंगळूरुमध्ये पकडलं. त्यानंतर ललितबाबत अनेक खुलासे बाहेर येऊ लागलेत. दरम्यान ललितबद्दल आणखी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ललित पाटीलचं आर्थिक कनेक्शन पोलिसांना सापडलं आहे.

पुणे पोलिसांकडून ललित पाटीलच्या आर्थिक कनेक्शनचा शोध?

ललित पाटील (Lalit Patil) याच्या आर्थिक कनेक्शन प्रकरणात नाशिकमधील सराफाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक (Nashik) येथे एका सराफासोबत ललित पाटील याचं आर्थिक कनेक्शन समोर आलं होतं. कैदी ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील यांनी या सराफाकडून आठ किलो सोनं खरेदी केलं होतं.

ललितने आणि त्याच्या भावाने हे सोनं ड्रग्जच्या पैशातून खरेदी केलं आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही सराफ व्यावसायिक पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. ललित पाटील याचे सर्व आर्थिक कनेक्शन आणि गुंतवणूक पोलीस शोधून काढत आहेत.

मुंबई पोलिस यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील गिरणा नदीपात्रात टाकलेले कोट्यवधींचे ड्रग्स शोधून काढले आहेत. ललित पाटील याच्यासोबत असणारे त्याचे मित्र तसेच त्याची प्रेयसी प्रज्ञा कांबळे हिला अटक केली आहे. याशिवाय ललित पाटील याच्याकडून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार केले गेले आहेत.

थोडक्यात बातम्या-