“जो 70 हजार कोटी चोरतो तो जेलमध्ये जात नाही, त्यामुळे तुम्ही मोठी चोरी करा”

अकोला | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केलीये. आमदार 20 ते 25 टक्के कमिशन मागतात. अजित पवार (Ajit Pawar) यांचा घोटाळा 70 हजार कोटींचा आहे. तुम्ही 10 हजाराची चोरी केली तर जेलमध्ये जाता. पण, जो 70 हजार कोटी चोरतो तो जेलमध्ये जात नाही. त्यामुळे तुम्ही मोठी चोरी करा. कारण चोरी मोठी केली की कारवाई होत नाही, अशी टीका आंबेडकरांनी केली.

राज्याच्या निवडणूका झाल्या की आज दिसणारा खेळ उलटा झालेला दिसेल. काही जणांच्या अंगात मरी आईचे भूत आल्यासारखे परिस्थिती आहे. पण, त्याच्या उताऱ्याचे औषध इथल्या मतदारांमध्ये आहे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी (Prakas अजित पवारांना लगावलाय.

जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आमचा पाठींबा आहे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. पण, ओबीसी म्हणतात आमच्यामधील आरक्षण देऊ नका. नंतर, धनगर आरक्षण मागतात. नंतर आदिवासी मोर्चा काढतात. वेगवेगळ्या समुहाला जाग करून पेटवलं आहे. ते एकमेकांशी भिडतील अशी परिस्थिती निर्माण केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, येणारे वर्ष हे निवडणुकीचे वर्षं आहे. जानेवारी, फेब्रुवारी नंतर लोकसभा होतील. पुढच्या नोव्हेंबर नंतर विधानसभा होईल. नंतर मनपा, जिल्हा परिषदेच्या निवडणूक होतील. हे वर्ष आणि पुढचे वर्ष निवडणुकीचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-