“बंडखोरांचा इतिहास लिहिला जातो, तळवे चाटणाऱ्यांचा नाही”

मुंबई | आझाद मैदानावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांच्या जहाल भाषणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

आम्हाला मिंधे म्हणता, तुम्ही अडीच वर्षे काय धंदे केले ते सांगा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर वाकण्यात आयुष्य गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ठाकरे नव्हे तर वाकडे आडनाव लावावं, अशी टीका ज्योती वाघमारे यांनी केलीये.

एकनाथ शिंदे यांनी महिलांना सन्मान देणारी बाळासाहेब ठाकरेंची महिला आघाडी उभी केली, महिलांना सन्मान दिला. हे आम्हाला मिंधे म्हणतात, गद्दार म्हणतात. पण बंडखोरांचा इतिहास लिहिला जातोय, तळवे चाटणाऱ्यांचा नाही, अशी घणाघाती टीका ज्योती वाघमारेंनी केलीये.

दरम्यान, बाळासाहेबांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी बाळासाहेबांना थेरडा म्हणणाऱ्या बाईला सन्मान दिला. तुळजाभवानीची चेष्टा करणारी बाई जर यांचा चेहरा असेल तर थू यांच्यावर. अशा बाईच्या पदराआड राजकारण करत असाल तर थू. हिंदुत्व विरोध करणाऱ्या लोकांना सन्मानाचं स्थान देताय, असं म्हणत ज्योती वाघमारेंनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .