मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मु्ंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जालना (Jalana) येथे अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरु केलं आहे. सरकारला 40 दिवसांचा वेळ देऊनही आरक्षणावर सरकारने आणखी कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. मात्र आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Ajit Pawar) हे दोघेही दिल्लीकडे (Delhi) रवाना होणार आहेत. नेमक्या कुठल्या विषयासाठी ते दिल्लीला निघाले आहेत, हे कळालं नाही. पण मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी हा दौरा होत असल्याचं म्हटलं जात आहे.

वारंवार सरकारला सूचना देऊन सुद्धा सरकार याबाबत कोणताही निर्णय घेत नसल्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा जिवाची परवा न करता उपोषणाला बसले आहेत. काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांची जालना येथे सभा झाली असता त्यांनी सरकारला इशारा दिला होता. एकतर माझी अंतयात्रा निघेल नाहीतर मराठा समाजाची विजयी यात्रा, असं ते म्हणाले होते.

मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असता त्यांना भाजप नेते गिरिश महाजन (Girish Mahajan) यांचा फोन आला होता. तेव्हा तुमच्या तीन चार मागण्या आज पूर्ण करतो. आपल्याला सर्वोच्च न्यायालयात टीकणारं आरक्षण द्यायचं आहे. त्यामुळे शिंदे समितीला वेळ लागत आहे. आम्हाला आणखी वेळ द्या असं महाजन म्हणाले, दरम्यान शिंदे आणि फडणवीस अचानक दिल्लीकडे रवाना होणार असल्यामुळे केंद्र सरकारशी चर्चा करुन काही तोडगा काढता येतोय का?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-