मुंबई | श्रद्धा कपूरने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आलिशान Lamborghini कार खरेदी केली आहे. दसऱ्या दिवशी श्रद्धाने स्वत:लाच ही कार गिफ्ट केली आहे. श्रद्धाचे नव्या कारसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्रद्धाने नुकताच तिने खरेदी केलेल्या नव्या लॅम्बोर्गिनी (Lamborghini) कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. automobiliardent या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रद्धा कपूरच्या नवीन कारचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
श्रद्धाच्या कार कलेक्शनमध्ये आता लॅम्बोर्गिनीचाही (Lamborghini) समावेश झाला आहे. श्रद्धाच्या कारची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. या कारची किंमत 4.04 कोटी रुपये आहे. श्रद्धाने BMW 7 सीरीज खरेदी केली होती.
या BMW ची किंमत 2.46 कोटी रुपये होती. त्यापूर्वी अभिनेत्रीकडे मर्सिडीज बेंझ जीएलई होती. ज्याची किंमत 1.01 कोटी रुपये होती.
महत्त्वाच्या बातम्या-