मुंबई | ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच भाजपवर देखील सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते, शिवसैनिकांना मिळत असलेल्या कारवाईच्या धमक्यांवर भाष्य केलं. ठाकरे यांनी म्हटले की, आज दमदाट्या करणाऱ्यांना सांगतो, आमच्या लोकांना विनाकारण आज त्रास दिला तर आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू, असा इशारा एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दिला आहे.
वारंवार घराणेशाहीवर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. सगळीच घराणी वाईट नसतात. तुम्हाला घराणेशाहीचा तिटकारा असेल तर तुमच्याकडे आमच्याकडून आलेल्या घराणेशाहीचं काय करणार? सद्दाम, मुसोलिनी, हिटलर यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी होती का, असा सवाल ठाकरेंनी केला.
ज्यांच्या घराण्याचा आगापिछा नसतो अशी लोक घातक असतात. जर्मनी हे त्याचं उदाहरण आहे. जर्मनीत आता हिटलरचा तिटकारा आहे. त्यालाही पाशवी बहुमत मिळालं. त्यानेदेखील अंधभक्त तयार झाले असल्याचं ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-