‘आता राजकारणात मन रमत नाही…’; निलेश राणेंच्या ट्विटने सर्वांनाच धक्का

मुंबई | भाजप नेते निलेश राणे यांनी राजकारणातून तडकाफडकी निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकारणात सर्वांनाच धक्का बसला आहे.

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19 ते 20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपमध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, निलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला होता. त्यांनी विनायक राऊत यांचा पराभव करण्याचा चंग बांधला. इतकंच नाही तर 2017 मधील एका कार्यक्रमात निलेश राणे यांनी, जोपर्यंत विनायक राऊत यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत दाढी न करण्याचा निर्धार केला होता. 

दरम्यान, निलेश राणे हे माजी खासदार आहेत. ते 2009 मध्ये खासदार झाले. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती.

महत्त्वाच्या बातम्या-