‘सरकारने तुम्हाला यासाठी…’; जरांगे पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय दिवसेंदिवस वाढत चाललाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarnage Patil) यांची सभा काही दिवसांपूर्वी जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी गावात पार पडली. त्यावेळी त्यांनी सरकारला 24 ओक्टोबर पर्यंत निर्णय घेणयासाठी वेळ दिला आहे. दरम्यान अजूनही सरकारकडून काही हालचाली दिसत नाहीये.

मराठा आरक्षणावरुन राजकिय नेत्यांनी देखील आपली मतं मांडायला सुरुवात केली आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनावर भाष्य केलं होतं. मनोज जरांगे यांच्या सभेला कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं नागरीकही का जातात?, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. अजित पवार यांनी केलेल्या त्या वक्तव्यावर जरांगे पाटलांनी चांगलाच समाचार घेतला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

अजित पवार यांनी आमच्यात फूट पाडायचं ठरवलं आहे? आम्ही भाऊ-भाऊ आहोत आणि आम्ही येणारच. तुमची जी भावना आहे ती त्यांची नाही. त्यांना वाटते गोरगरिब मराठ्यांना आरक्षण भेटावं, तुम्ही याच्यासाठी बाहेर पडले काय? इतके दिवस तर मराठा आंदोलनावर एक शब्दही बोलले नाही.

एवढ्यावर न थांबता जरांगे पाटील पुढे म्हणाले, की यासाठी सरकारने तुम्हाला पुढे घातलं आहे का? एकतर तुम्हाला यायचं नाही आणि आता मिठाचे खडे टाकता का? आमच्या तोंडात घास येत असताना त्यामध्ये माती कालवता का? तुम्हाला कोणी बंधन घातले का येऊ नका म्हणून? लोक येऊन पाठबळ देत आहेत आणि गरीब मराठ्यांचे कल्याण होईल, तर तुमचे पोट का दुखत आहे?, असे प्रश्न विचारत मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-