“चौपट लोकसंख्या वाढली, आपण एकदोन अपत्यावर थांबलं पाहिजे”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

सोलापूर | आपण एकदोन अपत्यावर थांबलं पाहिजे. सर्व समाजाने दोन मुलावर थांबलं पाहिजे. कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेलं नाही. देवाची कृपा, देवाची कृपा, काही देवाची कृपा नसते. आपलीच कृपा असते, अशी मिक्शिल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलंय.

अजित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. अजित पवारांनी सभेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणावर देखील अजित पवार (Ajit Pawar) बोलले.

मराठा आरक्षणाची गेल्या 63 वर्षात कधी मागणी नव्हती. विलासराव देशमुख असताना आरक्षणाच्या मागणीने डोकं वर काढलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आरक्षण द्यायचा निर्णय झाला. आम्हाला जो सल्ला देण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आरक्षण दिलं. पण कोर्टात टिकलं नाही. नंतर फडणवीस यांचं सरकार आलं. त्यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

मीही मराठा समाजाचा आहे. दुसऱ्या समाजाचा नाही. मलाही समाजातील गरीब वर्गाला आरक्षण मिळावं वाटतं, असंही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-