क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बिशन सिंह बेदी (Bishan Singh Bedi) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

बिशन सिंग बेदी यांनी 1967 ते 1979 या काळात 67 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी 266 विकेट्स घेतल्या.

बिशन सिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसरमध्ये झाला होता. तेव्हा त्यांच्या फिरकी गोलंदाजीच्या विशिष्ट शैलीमुळे ते चर्चेत आले होते. 20 व्या वर्षी, अर्थात 1966 साली त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली.

सोशल मीडियावर नेटऱ्यांनी बिशन सिंह बेदी यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. प्रत्येक जण बिशन सिंह बेदी यांच्याबाबतच्या क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देत आहे. तसेच बीसीसीआयनेही ट्विट करत बिशन सिंह बेदी यांन श्रद्धांजली वाहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-