अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ; मराठा आंदोलकाने दाखवले काळे झेंडे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

सोलापूर | महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) वातावरण चांगलंच तापलं आहे. एवढंच नव्हे तर काही जणांनी जिवाची परवा न करता टोकाचं पाऊल सुद्धा उचललं आहे. आरक्षणासाठी सरकारकडे अनेकजण मागणी करत आहेत मात्र आम्ही तुम्हाला लवकरच आरक्षण देऊ, असा शब्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिला आहे. मात्र आंदोलनकर्ते आक्रमक होत असल्याचं दिसतंय. सोलापूरात अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

काय आहे नेमकं प्रकरण?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर (Solapur) येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान यावेळी अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

कार्यक्रमावेळी अजित पवार शेतकऱ्यांसोबत संवाद साधत होते. यावेळी अजित पवार ऊभे राहताच तेथील काही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात देखील घेतलं आहे.

थोडक्यात बातम्या-