पुणेकर उडणार हवेत; पुणेकरांसाठी आंनदाची बातमी समोर

पुणे | पुण्यात (Pune) काही भागात वाहतूक कोंडीची कायम बोंब असते. त्यामुळे पुणेकरांसाठी मेट्रो (Pune Metro) देखील सज्ज झाली आहे. दरम्यान पुणेकरांसाठी अणखी एक आंनदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच पुण्यात स्काय बसचं काम सुरु करण्यात येणार आहे. देशात प्रथमच 5 शहरात ही बस सेवा सुरु होणार असून त्यात पुणे शहराचा समावेश केला गेला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकारी (Nitin Gadkari) यांनी यासाठी स्वत: पुढाकार घेतला असून येत्या 2 वर्षात ही सेवा सुरु होणार आहे. गोवा, वाराणसी, हैद्रबाद, गुरुग्राम आणि पुणे या 5 शहरात ही सेवा सुरु असणार आहे. या बसची ट्रायल रन (Trial Run) गोवा ते मडगाव दरम्यान घेण्यात येणार आहे. यासाठी मडगाव येथे रुट तयार करण्यात आला होता. परंतु 2016 मध्ये ट्रॅक आणि पिलर काढण्यात आले. 

कसा असणार स्काय बससाठी रुट?

यबसचा रुट डिव्हाइडर वरती करण्यात येणार आहे. डिव्हाइडरवर पिलर बसवून हा रुट तयार केला जाणार आहे. स्काय बस 100 किमी वेगाने धावू शकते. यासाठी अप अन् डाऊन अशा दोन पटरी तयार कराव्या लागणार नाही. यासाठी स्थानकावर ट्रावर्सर या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

थोडक्यात बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .