“विष कसं पेरायचं ते सगळं या माणसाकडून शिकावं”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

सांगली | विष कसं पेरायचं? ते या माणसाकडून शिकलं पाहिजे, अशी जळजळीत टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) केलीये. सांगली येथील आरेवाडीमध्ये गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दसरा मेळाव घेतला. यावेळी बोलताना पडळकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव न घेता जहरी टीका केली. 

समाजाचा पहिल्यांदा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाला असता. म्हणजे हे सगळं जे षडयंत्र सुरू आहे. या षडयंत्राकडं आपण नीटपणे बघितलं पाहिजे. या महाराष्ट्रातल्या धनगरांची चळवळ पहिल्यांदा स्वर्गीय बी के कोकरे यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये उभी केली. परंतु बी के कोकरे यांना संपवण्याचं त्यांची संघटना संपवण्याचं मोठं पाप यांनी केलं. माननीय शिवाजी शेंडगे बापूंना राजकारणामध्ये काही काळ वापरून घेतलं. परत त्यांना बाजूला करून टाकलं. त्यांच्या पूर्ण घराला बाजूला करून टाकलं. म्हणजे विष कसं पेरायचं? ते ह्या सगळ्या माणसाकडून शिकलं पाहिजे अशी जळजळीत टीका पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली.

या लांडग्याला माहित आहे जर बहुजन एक झाले तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं. म्हणून समता परिषदेला दाबायचा प्रयत्न झाला. गोपीनाथरावजी मुंडे साहेब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले असते. परंतु, काही आमदारांना फूस लावली आणि मुंडे साहेबांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवलं, असंही पडळकर म्हणालेत.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी आमदार असताना घेतली. तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढलं. मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध केला, असा आरोप पडळकर यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-