मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य!

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मराठा समाज बांधवांनी टोकाचं पाऊलं उचलू नये, असं आवाहन केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याचं शिंदेंनी सांगितलं आहे. मराठा कुटुंबातील मुलांनी आत्महत्या करणं आमच्यासाठी दु:ख देणारी वेदणा देणारी घटना आहे. आत्महत्या झाल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत. सरकार सर्व प्रयत्न करत आहे, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. 

मराठा समाजातील तरुणांचा जीव इतका स्वस्त आहे का? आपल्या कुटुंबाचा विचार केला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

मी कोणालाही खोटं आश्वासन दिलं नाही. मी कुणाची फसवणूक केली नाही. मी राजकीय आयुष्यात जे काही बोललो आहे ते सगळं केलंय. आमचं सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूने आहे, असं शिंदे म्हणालेत.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांसमोर आपले तज्ज्ञ वकील पुरावे सादर करतील. मराठा आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी संधी निर्माण झालेली आहे. मराठवाड्यातील कुणबी नोंदी असणारांना दाखले देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती काम करत आहे. त्याचं देखील युद्ध पातळीवर काम सुरु आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-