“मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही”

मुबंई | शिवसेनेकडून (Shvisena) दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर, दोन्ही गटाने स्वतंत्र दसरा मेळाव्याचं आयोजन केलं. मात्र मैदान मिळवण्यासाठी दोन्ही गट आमने-सामने आले होते. अखेर शिवतीर्थ मैदान शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळालं होतं. यंदाही ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थ याच मैदानावर होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा ‘आझाद मैदानावर होणार आहे. दसरा मेळाव्याला दोन दिवस बाकी असताना, ठाकरे गटाच्या मेळाव्याचा टिझर शेअर करण्याता आला आहे. या टिझरमधून ठाकरे गटाने शिंदे गटाला गद्दार म्हणत अप्रत्यक्षपणे डिवचलं आहे.

मुबंईच्या दादरमधील शिवतीर्थ मैदानावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून मेळाव्याची जय्यत तयारी चालू आहे. त्या अनुषंगाने ठाकरे गटाने मेळाव्याचा टिझर रिलीझ केला. या टिझरमधून ठाकरे गटाने शिंदे गटाला टार्गेट केलं आहे.

ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली आहे. टिझरमध्ये म्हटलं आहे की, “काहीजण पळून जाणारे असतात. शेपूट घालून बसणारे असतात. स्वार्थासाठी इमान विकणारे असतात. शत्रूंशी हात मिळवणारे असतात. खाल्या ताटात थुंकणारे असतात. खोक्यापायी विकले जाणारे असतात. रात्रीच्या अंधारात गद्दारी करून घर फोडणारे असतात. पण मर्द विकला जात नाही. मर्द गद्दारी करत नाही. मर्दांचं एकच ठिकाण. शिवतीर्थ दादर. एक नेता, एक विचार आणि एक मैदान. दसरा मेळावा, मर्दांचा मेळावा.”

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav thakare) शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. टिझरमधून शिंदे गटावर निशाणा साधल्याचं दिसत आहे. आता मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार? आणि कुणाला लक्ष्य करणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या