“फुटलाय याचा पुतण्या आणि लागलेत कुणाच्या मागं?”

सांगली | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करताना दिसतात. आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी (Gopichand Padalkar) शरद पवारांवर टीका केलीये.

सांगली येथील आरेवाडीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी दसरा मेळाव घेतला यावेळी बोलताना पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता जहरी टीका केली. आपल्यामध्ये फूट पाडावी असा प्रयत्न केला जातोय. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कसे विभागला जाल? अशा पद्धतीचं षडयंत्र महाराष्ट्रामधून राबवलं जातंय. लबाड लांडग्यांच्या पिलावळीनी विष पेरायला सुरुवात केलीय. लबाड xxxx कोण आहे हे तुम्हाला माहित आहे की नाही?, अशी टीका पडळकरांनी केलीये.

मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतनं फुटला. आता त्याचा पुतण्या पार्टीतनं फुटला यात दुसऱ्याचा काय दोष आहे? पण, हे सगळेजण छगन भुजबळांच्या विरोधामध्ये शिव्या शाप द्यायला लागलेत. फुटलाय याचा पुतण्या आणि लागलेत कुणाच्या मागं?, असं म्हणत पडळकरांनी पवारांवर निशाणा साधलाय.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी आमदार असताना घेतली. तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढलं. मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध केला, असा आरोप पडळकर यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .