“मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो..”

मुंबई | मुख्यमंत्राी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी शिवरायांची शपथ घेत मराठा समाजाला अतिशय मोलाचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी मराठा तरुणांना महत्त्वाचं आवाहन केलं.

शिंदेंनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं. मी देखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातला आहे. मला त्यांचं दु:ख, वेदना कळतात. मलाही त्यांची जाणीव आहे, असं एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सांगितलं.

जस्टीस शिंदे यांची कमिटी खूप काम करत आहे. आपण सुप्रीम कोर्टात क्युरिटीव्ह पिटीशन दाखल करुन घेतलं आहे. कुणावरही अन्याय न करता, कुणाचंही आरक्षण काढू न घेता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार (Goverment) देणार म्हणजे देणार, असं शिंदे म्हणाले.

या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार. इतर कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देणार. कारण सर्व समाजबांधव आपले आहेत, असं शिंदे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-