नाशिक | पुणे शहरातील ससून रुग्णालयातून सुरु झालेले ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्स प्रकरण धक्कादायक वळणावर आलं आहे. मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये जाऊन कोट्यवधी रुपयांचा ड्रग्स जप्त केला. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नाशिक (Nashik) पोलिसांनी एका ड्रायव्हरची चौकशी केली आहे. शहरातील शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याचा हा ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आली आहे. ललितच्या अपघातग्रस्त कारची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित ड्रायव्हरने मध्यस्थी केल्याने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
ललित हा पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांकडे वारंवार यायचा. तेव्हा त्याच्याशी ओळख होती. वाहनाचा अपघात झाल्यावर त्याने दुरुस्तीबाबत विचारलं. तेव्हा गॅरेजमध्ये कार लावली. दुरुस्तीनंतर बिल तयार झालं. परंतु ललित पुन्हा आलाच नाही, असं ड्रायव्हरने चोकशीदरम्यान सांगितलं.
दरम्यान, ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्स तस्करीत येण्यापूर्वी नाशिकमधील राजकारणात होता. दोन राजकीय पक्षांमध्ये त्याने काम केलं आहे. या मुद्द्यावरून नाशिक शहर व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी ललितसोबतच्या संबंधांचे आरोप खोडून काढण्याचे प्रयत्न केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-