‘मनोज जरांगे पाटलांना अटक करा’; गुणरत्न सदावर्ते भडकले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या घरावर हल्ला झाला आहे. यानंतर सदावर्ते आक्रमक झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतानाच प्रचंड संतापही व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या 16मजली इमारतीत राहतात. या इमारतीबाहेर असलेल्या पार्किंगमध्ये त्यांच्या दोन गाड्या उभ्या होत्या. मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्यामुळे यापूर्वीच गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र तरीही गुरुवारी सकाळी काहीजणांनी गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अलिशान गाडीच्या काचा फोडल्या.

या सगळ्या प्रकारानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. मी मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारु इच्छितो की, हीच तुमची शांततापूर्ण मराठा आंदोलनाची व्याख्या आहे का? अशाप्रकारेच हल्ले करुन मला शांत करता येणार नाही.

माझी मुलगी झेन, पत्नी जयश्री पाटील आणि मला सतत धमक्या येत आहेत. या धमक्यांमुळे गेल्या आठ दिवसांपासून माझी मुलगी झेन शाळेत गेलेली नाही. झेनला ठार मारण्याच्या, जयश्री पाटील यांना उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असं सदावर्तेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-