भाजपला जोर का झटका; ‘या’ नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | पुण्यातील भाजपचे प्रवक्ते आणि माजी शहरप्रमुख एकनाथ पवार (Eknath Shinde) यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली होती. आता एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

पिंपरी चिंचवडमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ पवार यांच्यावर पक्षाच्या संघटकपदाची जबाबदारी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली होती. त्यानंतर मी पक्षात येण्याचा निर्णय घेतला. यापुढे पिंपरी चिंचवड बरोबरच नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं

भाजपने आपल्या पक्षाच्या नेत्यांचे खच्चीकरण केले. तसेच माझ्याकडे काहीही नसताना एकनाथ पवार माझ्याकडे आले आहेत. त्यांना मी काहीही देऊ शकत नाही. मात्र एकनाथ पवार यांनी जशी पिंपरी चिंचवड आणि नांदेड जिल्ह्यात काम केलं. तसेच काम महाराष्ट्रभर करावं, असं उद्धव ठाकरेंनी पक्षप्रवेशाच्यावेळी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-