महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकाराचं निधन!

मुबंई | जेष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर ( Baba maharaj satarkar) उर्फ निळकंठ महाराज गोरे याचं निधन झालं आहे. वृद्धापकाळाने त्याचं निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी आखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नेरूळमधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मावळली.

आज दुपारी 3 वाजता नेरुळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता नेरुळच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाबा महाराज सातारकर मुळचे साताऱ्याचे होते. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्याच्या नामवंत किर्तनकार घराण्यात झाला. त्यांनी वकिलीच्या पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. त्यांना किर्तनाचा वारसा कटुंबाकडूनच मिळाला. त्यांच्या गोरे घराण्यात 135 वर्षांच्या किर्तन सेवेची परंपरा आहे. त्यांचे आध्यात्मिक क्षेत्रात मोलां योगदान आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर, जगभरात त्यांचे किर्तन आणि प्रवचने व्हायचे. अत्यंत साध्या भाषेत त्यांची किर्तनं आणि प्रवचने होत असायची.

बाबा महाराज सातारकर यांनी आयुष्यभर किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम केले.त्यांनी जवळपास 15 लाख लोकांना सांप्रदायाची दिक्षा दिली आणि व्यसनमुक्त केले. समाजप्रबोधनासोबतच समाजसेवेचेही काम केलं.

महात्वाच्या बातम्या