“दिल्लीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पायपुसणं केलंय”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. मात्र सरकारकडून अजून तरी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे.

मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे तातडीने दिल्लीला (Delhi) रवाना झाले. आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी ते दिल्लीला गेले अशा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या अचानाक दिल्लीला जाण्यावरुन शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

खासदार संजय राऊत म्हणाले, की “एकनाथ शिंदे म्हणतात की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेबांचा स्वाभिमानी शिवसैनिक आहे, असं बोलणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांचं दिल्लीने पायपुसणं केलं आहे.”

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीला जात आहे. दिल्लीमध्ये या सरकारचं पायपुसणं केलेलं आहे. संजय राऊत पुढे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज एकदाच दिल्ली आणि आग्र्याला गेले आणि सर्व खानांना धडा शिकून आले होते. चहा पिऊ का? पाणी पिऊ का? हे विचारण्यासाठी तुम्हाला वारंवार दिल्लीत जावं लागतं ही खरंच लाजिरवाणी बाब आहे.

थोडक्यात बातम्या-