“गाडी फोडण्याची शिक्षा कमी झाली, खरं तर सदावर्तेंना संपवायला हवं होतं”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला वारंवार इशारा देऊन सुद्धा मराठा आरक्षणावर सरकारने घोंगडं भिजत ठेवलं आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. सरकार यावर निर्णय घेत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाले आहेत. दरम्यान आज मुंबई येथे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या महागड्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या वेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना संताप व्यक्त करत जरांगे पाटलांना अटक करा, अशी मागणी केली. याशिवाय ते म्हणाले की एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही, आमचंही ऐकायचं आणि जरांगेंचे लाड थांबवले नाही, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल.

सदावर्ते यांनी संताप व्यक्त केल्यानंतर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच मराठा समाजाचं आरक्षण हिरावून घेतलं गेलं. मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात बाजू मांडली होती .म्हणूनच सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली आहे, असं ते म्हणालेत.

सदावर्तेंना संपवायला हवं होतं. जर ते संपले असते तर मराठा आरक्षणाचा मार्ग त्यावेळी मोकळा झाला आसता, असं गायकवाड म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-