महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी समोर!

मुबंई | मुबंईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. तसेच अनेक मोठी उद्याेग मुंबईत आहेत. हिऱ्यांच्या व्यापारासाठी मुंबई प्रसिद्ध आहे. हिऱ्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार मुंबईतून केला जातो. या उद्योगातून मोठा कर राज्य सरकारला मिळतो. मात्र राज्य सरकारला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसतंय.

मुंबतील हिरे व्यावसायिकांनी उद्योग गुजरातला हलवण्यास सुरवात केली आहे. अनेक हिरे उद्योजकांनी व्यवसायासाठी गुजरातची निवड केली आहे.

सूरत शहराला डायमंड सिटी म्हणून ओळखलं जातं. या शहरात हिऱ्यांचे कारखाने आहेत. जगभरात सुरतमध्ये तयार होणाऱ्या हिऱ्यांची विक्री होती. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ आसल्याने तेथून हिऱ्यांचा आंतरराष्ट्रीय व्यपार केला जातो. त्यामुळे हिरा उद्योजकांची मुंबईत स्वतंत्र कार्यालये आहेत. सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी सुरत शहरात सूरत डायमंड बुर्स या नावाचं जागतिक दर्जाचं मोठं हिरे व्यवसाय केंद्र तयार केलं आहे. हे केंद्र सर्व सोयी सुविधायुक्त आहे. त्यामुळे अनेक हिरा उद्योजकांनी मुंबईतील आपले व्यवसाय बंद केले आहेत. त्यामुळे सरकारला मिळणार कर कमी होणार आहे.

सूरतच्या हिरे उद्योजकांनी एकत्र येत या केंद्राची स्थापना केली. मुंबईतील आणि गुजरातचे व्यापारी एकाच छताखाली यावे या उद्देशाने सूरत डायमंड बुर्सची स्थापना झाली. हे जागतिक दर्जाचं केंद्र आहे. तेथील व्यपाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त किमतीने या इमारतीची जागा खरेदी केली. अंदाजे 3400 कोटी रुपये खर्च करून, सूरत डायमंड बुर्सची इमारत उभा केली. या केंद्रात उद्योजकांसाठी सगळ्या सुविधा आहेत. जवळपास 4300 कंपन्यांची कार्यालये या केंद्रात आहेत.

महत्वाच्या बातम्या