“गाड्या फोडणं हा मोठा गुन्हा नाही, तो समाजासाठी लढतोय”

मुंबई | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या 3 कार्यकर्त्यांनी आज वकील गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्या इमारतीजवळ जावून त्यांच्या महागड्या गाडीची तोडफोड केली. घडलेल्या प्रकारावरुन सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करणारा तरुन नेमका कोण आहे? हे समोर आलं आहे. माध्यमांच्या माहितीनूसार छत्रपती संभाजीनगर (Chatrapatti Sambhaji Nagar) शहरातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या गेवराई पायगाव येथील सरपंच मंगेश साबळे (Mangesh Sable) या तरुणाने तोडफोड केल्याचं सांगण्यात आलं आहे. मंगेश साबळे हा गेवराई पायगाव येथील सरपंच आहे.

गुणरत्न सदावर्ते गेल्या काही दिवासांपासून आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य करत असल्याने त्यांच्याबद्दल राग काढण्यासाठी मंगेशने गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान घडलेल्या प्रकारावर मंगेशच्या आईने प्रतिक्रिया दिली. “माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला नाहीय. तो समाजासाठी लढतोय. त्याला न्याय दिला पाहिजे. गाड्या फोडणे हा मोठा गुन्हा नाही. सरकार आरक्षण देत नाही, त्यामुळे माझ्या मुलाने हे पाऊल उचललं आहे, असं मंगेशची आई म्हणाली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या दोन-तीन वर्षपासून तो उपोषण करतोय, असं म्हणत त्यांना अश्रू आऩावर झाले.

थोडक्यात बातम्या –