शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?- नरेंद्र मोदी

अहमदनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज शिर्डी (Shirdi) दौरा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते अनेक कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. या बरोबरच त्यांनी शिर्डीत साईबाबांचं (Saibaba temple) दर्शन घेतलं. दरम्यान त्यांनी सभेत बोलत असताना शरद पवार यांच्यावर टीका केली.

नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

नेमकं काय म्हणाले मोदी?

नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्रातील एक मोठे नेते आणि अनेक वर्षे देशाचे कृषिमंत्री असलेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत काय केलं?. त्यांनी त्यांच्या कृषीमंत्रिपदाच्या 60 वर्षाच्या कार्यकाळात किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपीचे (MSP) फक्त साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. याउलट आमच्या सरकारने ऐकून साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले.”

“शरद पवार जेव्हा कृषीमंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्यांना पैशांसाठी दलालांवर अवलंबून राहावं लागायचं, त्यांना महिनोन-महिने पैसे मिळत नव्हते. मात्र आता आज आमचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे टाकते, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्य-