‘आपण इतर देशांचा सामना करु शकत नाही’; नारायण मूर्ती थेट बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी देशातील तरूणांना मोलाचा सल्ला दिला आहे. ल्या दोन-तीन दशकांत आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे, असं ते म्हणालेत. देशातील तरुणांनी दर आठवड्याला 70 तास काम करावे, असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला.

भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. सरकारमधील भ्रष्टाचार आणि नोकरशाहीतील दिरंगाई ही कार्याची उत्पादकता कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत, असं सांगत नारायण मूर्ती यांनी सरकारवर टीका केली.

जोपर्यंत आपण सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार कमी करत नाही आणि नोकरशाहीतील दिरंगाईला आळा घालत नाही, तोपर्यंत आपण ज्या देशांनी प्रचंड प्रगती केलीय, त्यांच्याशी स्पर्धा करणे अवघड आहे, असंही नारायण मूर्तींनी सांगितलंय.

देशाची कार्य उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांना पुढे यावे लागेल. “मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन हा देश माझा आहे म्हणा, असं आवाहन त्यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-