‘बारामतीत आलात तर…’; अजित पवारांना मराठा समाजाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बारामती | आरक्षणासाठी (Maratha reservration) मराठा समाज आक्रमक झाला आहे. दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे ( Manoj jarange patil ) पाटलांना राज्यभरातील मराठा बांधवाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषणं सुरु आहेत. त्यासोबतच अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या निर्णयाचा मोठा फटका राजकिय नेत्यांना बसत आहे.

राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आसल्याचं चित्र राज्यात पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar ) यांनाही प्रवेश बंदीच्या निर्णयाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. बारामतीच्या माळेगावात मराठा क्रांती मोर्चाने अजित पवारांना प्रवेश नाकारला आहे.

अजित पवार यांचा दर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी बारामतीचा नियोजित दौरा असतो. येत्या शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी अजित पवार हजेरी लावणार आहेत. मात्र त्याआधीच मराठा क्रांती मोर्चाने अजित पवार यांच्या माळेगावातील प्रवेशाला विरोध केला आहे. या संबधित निवेदन त्यांनी पोलिसांना आणि माळेगाव साखर कारखान्याच्या प्रशासनाला दिलं आहे.

अजित पवारांनी माळेगावात येऊ नये. त्यांनी कारखान्याच्या गळीत हंगामाची मोळी टाकू नये. त्यांनी या कार्यमाला हजेरी लावू नये. अन्यथा हजारोंच्या संख्येने आणि मोठ्या ताकदीने मराठा समाज तेथे उपस्थित राहिल. त्यानंतरही कार्यक्रम घेतला तर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्च्याने दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-