फोन चोरी झाल्यावर पहिलं करा हे काम; कोणालाही वापरता येणार नाही

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आज बाजारात अनेक प्ररकारची सेवा देणारे फोन आहेत. आपण महत्त्वाची माहिती फोनमध्ये जतन करुन ठेवतो. मात्र फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर आपल्या मनात अनेक शंका निर्माण होतात. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलमध्ये जतन केलेला डेटा सुरक्षित राहू शकतो. त्यासाठी भारत सरकारने CEIR हे पोर्टल चालू केले आहे. मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल डेटा सुरक्षित ठेऊ शकता.

काय आहे CEIR पोर्टल ?

भारतीय दूरसंचार विभागाने हे पोर्टल सुरु केले आहे. मोबाईल डेटा किंवा त्यामध्ये आसणाऱ्या माहितीशी कोणीही छेडछाड करु नये. त्यासाठी या वेबपोर्टलची सुरूवात करण्यात आली आहे. मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास या पोर्टलवर नोंदवल्यास मोबाईल डाटाशी होणारी छेडछाड थांबवता येते. तुमचा मोबाईल तात्काळ ब्लॉक केला जातो. सर्व सामान्य माणूस या पोर्टलवर सहज नोंदणी करु शकतो. घरबसल्या या पोर्टलवर नोंदणी करता येते.

नोंदणी कशी कराल ?

1. सर्वप्रथम जवळच्या पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याचा एफआयआर नोंदवावा.

2. तुमच्या दूरसंचार सेवा प्रदात्याकडून हरवलेल्या नंबरसाठी डुप्लिकेट सिम कार्ड मिळवा

3. सीईआयआर तक्रार ऑनलाइन नोंदणीसाठी पोर्टलवर जा.

4. पोर्टलवर मोबाईल नंबर/IMEI क्रमांक भरून माहिती सबमिट करा.

5. संपर्क साधण्यासाठी तुमचा चालू मोबाईल नंबर आणि पत्ता प्रविष्ट करा.

महात्वाच्या बातम्या