‘…म्हणून मी गाढव पाळलं’; गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्रात सध्या ट्रेंडिंगला अॅड गुणरत्न सदावर्ते यांची जोरदार चर्चा आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणं सदावर्तेंच्या चांगलंच अंगलट आलं आहे. गुणरत्न सदावर्ते कायम आपल्या खोचक बोलण्यावरुन चर्चेत असतात. मध्यंतरी गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाला होता. सदावर्तेंनी चक्क गाढव पाळल्याच्या चर्चा सुद्धा होत्या. मात्र खरंच त्यांनी गाढव पाळलाय का? असा प्रश्न अनेक जणांना पडलाय.

घरात एखादा पाळीव प्राणी असावा असं अनेक जणांना वाटतं. त्यामुळे काहीजण घरात कुत्र, मांजर किंवा आणखी काही मुक्या जणावरांना लळा लावत असतात. दरम्यान सदावर्ते यांच्या घरी चक्क गाढव पाळल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी गाढव पाळण्यात आलं आहे. या गाढवामुळे सदावर्तेंना चांगलंच ट्रोल केलं होतं. या गाढवाचं नाव मॅक्स असं ठेवण्यात आलं आहे.

गाढव पाळण्या मागचं कारण सदावर्तेंनी सांगितलं…

गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांसोबत बोलत असताना या मागचं कारण सांगितलं. आम्ही ते गाढव आमची मुलगी झेन सदावर्ते, तिच्या लाडासाठी माळेगाव यात्रेतून घेतलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी योग अभ्यासक आहे. तुम्हाला माहित आहे का? गाढव पाळण्या मागचं कारण हे आहे की त्याचं दुध पिल्याने आपल्याला कोणताही आजार होत नाही.

याशिवाय पोटातले आजार त्या दुधामुळे समूळ नष्ट होतात. उच्चभ्रू कुटुंबामध्ये वेगवेगळ्या मशीन आणल्या जातात. परंतु बालकांना पोटातल्या आजारांसाठी गाढवाचं दूध मिळत नाही. म्हणून ते गाढव आमची मुलगी झेन सदावर्तेसाठी आम्ही पाळलं आहे. गाढव हे लोकोपयोगी आहे आणि आम्ही प्राणी प्रेमी आहोत, असं सदावर्ते म्हणाले.

सदावर्ते म्हणाले की, आमच्या गाढवाचं नाव मॅक्स ठेवलं आहे. पुढे ते म्हणाले माझ्या वडिलांच्या काळात त्यांच्या घरी डजनाहुन अधिक प्राणी होते. मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी आले पाहिजे. माझे वडील लोकप्रतिनिधी होते, त्यांनी मेडिकल कॉलेजला स्वतःचं देहदान केलं. त्यामुळे आम्ही अशा वृत्तीची माणसं आहोत. हे सगळ अर्धज्ञानातून लोक बोलत असतात.

मी गाढवाच्या लग्नाऐवजी त्याच्या दुधाचे खरे परिणाम आणि औषधयुक्त दूध असतं हे सांगितल्यानंतर टीका करणाऱ्यांना मला असं वाटतं हे टॉनिक आहे, असं सदावर्ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय आल्यानंतर या मॅक्सला पेढे भरवल्याचं समोर आलं होतं. सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी त्यांच्या फेसबुकला या मॅक्सचे फोटो शेअर केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-