“ज्यांची लायकी ही काँग्रेस आणि सिल्वर ओकच्या पायपुसण्याइतकीच आहे, त्या संजय राऊतांनी…”

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजप सरकारवर टीका करताना दिसतात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) देखील राऊत टीका करत असतात.

दिल्लीने एकनाथ शिंदेंचं पायपुसणं केलंय, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात येतंय. शिवसेनेच्या महिला नेत्या प्रा डॉ ज्योती वाघमारे (Jyoto Waghmare) यांनी खासदार संजय राऊतांवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

ज्यांची लायकी ही काँग्रेस आणि सिल्वर ओकच्या पायपुसण्याइतकीच आहे, त्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये, असं म्हणत ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतीय संविधानानुसार भारत एक संघराज्य आहे आणि दिल्ली ही देशाची राजधानी आहे. जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात, चर्चा करतात तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ते महत्वाचं असतं. दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं आहे की छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून महाराष्ट्राचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी ते कटीबद्ध आहेत, असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-