“सदावर्ते परत आमच्या नादाला लागू नको नाही तर…”

छत्रपती संभाजीनगर | मराठा आरक्षणाचा विषय सध्या सगळीकडे चांगलाच पेटला आहे. सरकारला 40 दिवसांची मुदत देऊन सु्द्धा सकारने यावर काही तोडगा काढला नाही. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा त्यांचा तिसरा दिवस आहे.

मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. त्यांना अटकही झाली. यामध्ये सरपंच मंगेश साबळे (Mangesh Sable) यांचाही समावेश होता.

आता मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadawarte) यांना पुन्हा इशारा दिला आहे. गुणरत्न सदावर्तेला मी तुम्हाला सांगू इच्छितो की, परत आमच्या नादाला लागू नको. लागला तर तुझी मंगेश साबळेशी गाठ आहे, असा इशारा मंगेश साबळे यांनी दिला आहे.

या गुणरत्न सदावर्तेमुळे आज माझे समाजबांधव आत्महत्या करत आहेत. पण मी माझ्या बांधवांना सांगून विनंती करतो की, आत्महत्या करून मरू नका. तर लढून मरा, असं मंगेश साबळे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-