देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडीओ कोणी व्हायरल केला? भाजपने सांगितलं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल काय सांगता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे अचानक दिल्लीला रवाना झाले होते. यावेळी गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांची भेट घेतली. तिकडून आल्यानंतर भाजपच्या ट्विटर अकाउंटवरुन देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ व्हयरल (Viral Video) झाला. ज्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं.

व्हायरल झालेला तो व्हिडीओ कोणता?

देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन असं वचन देतानाचा व्हिडीओ पुन्हा ट्विट करण्यात आला होता. 2019 च्या निवडणुकीआधी फडणवीसांनी विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले होते. नवं महाराष्ट्र नवनिर्मितीसाठी भाजपने त्यांचा हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कोणी ट्विट केला याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bavankule) दिली.

माध्यमांशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की महाराष्ट्र भाजप या अधिकृत ट्विटर अकांउटवरुन हे सूचक ट्विट करण्यात आले होते. अतिउत्साही कार्यकर्त्याने फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट केला. मात्र 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहातील असं बावनकुळे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-