आता कुठलीच सासू सुनेला नकटी म्हणणार नाही, कारण…

पुणे | पुणे (Pune) शहरात धक्कादायक प्रकार घडला. पुण्यात सुनेला नकटी बोलणं सासूला चांगलंच महागात पडलं आहे. रागाच्या भरात सुनेनं अत्यंत धक्कादायक कृत्या केलंय. यामुळे संपूर्ण पुणे शहर हादरलं.

सासूने सुनेला नकटी म्हटली. त्यानंतर सुनेला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने सासूवर चाकूने हल्ला केला. या घटनेत सासू गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संध्या अशोक मगर यांची मालनबाई परशुराम मगर या सासू आहेत. या दोघी घरामध्ये असताना संध्या ही मालनबाई यांना तू नकटी आहेस, असं बोलली. त्यावर मालनबाई यांनी सुद्धा चिडून तिला तू पण नकटीच आहेस असं म्हटलं.

दरम्यान, या प्रकरणी सासू मालनबाई हिने दिलेल्या फिर्यादीवरुन सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू-सुनेमधील या प्रकारानंतर परिसरातील अनेकांना धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-