भाजपला सर्वात मोठा धक्का; ‘हे’ राज्य हातातून जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

भोपाळ | पुढील महीन्यात राज्यस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणुक आयोगाने (Central election commission) या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काँग्रेस, भाजप आणि इतर प्रादेशिक पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी चालू केली आहे. मध्यप्रदेश राज्यात काँग्रेस ( Congress )आणि भाजपची तयारी सुरू आहे. दोन्ही पक्ष राज्यात सत्ता येणार असल्याचा दावा करत आहेत. मध्यप्रदेशात भाजप ( Bjp) सत्तेत आहे. एका वृत्त वाहिनीनेकेलेल्या सर्व्हेनुसार भाजपची मध्यप्रदेशातील सत्ता जाण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. त्या आगेदर त्या वृत्तवाहिनीने सर्वेक्षण केलं. 28 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला.  या सर्वेक्षणात जवळपास 11 हजार 500 लोकांनी सहभाग नोंदवला. या सर्वेनुसार मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेश विधानसभेची (Madhyapradesh assembly) 230 जागांसाठी निवडणुक पार पडणार आहे. सर्वेनुसार मध्यप्रदेशात भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मजबुत आहेत. त्यामुळे मतांच्या टक्केवारीत केवळ तिन टक्क्यांचा फरक आहे. मात्र मिळणाऱ्या जागांमध्ये मोठा फरक आहे.

या निवडणुकीत भाजपला 43 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे तर, काँग्रेसला 46 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांच्या पारड्यात  11 टक्के मतं जाताना दिसत आहेत. काँग्रेसला 132 ते 146 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला 84 ते 98 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना  0 ते 5 जागांवर समाधान मानावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या