शिंदे गटासाठी मोठा धक्का, ‘हा’ आमदार देणार राजीनामा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

हिंगोली | मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी याआधी सुद्धा उपोषण केलं होतं. वारंवार सरकारला सांगून सुद्धा याबद्दल भूमिका घेतली जात नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषाणाला बसले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती समोर आलीये. मराठा आरक्षणासाठी शिंदे गटातील आमदार राजीनामा देणार असल्याचं कळतंय.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये. संतोष बांगर यांना फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख आपण मराठा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं. माझं नाव रमेश पाटील आहे असं म्हणत मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का? असा प्रश्न बांगर यांना विचारला. त्यावर संतोष बांगर हो असं म्हणाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी संतोष बांगर राजीनामा देणार का याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे.

मराठा आरक्षणावरुन राज्याच्या राजकारणात देखीला वाद विवाद सुरु होते. राजकारणातील अनेक नेते, मंत्री यांच्या गाड्या फोडण्यात आल्याशिवाय काही नेत्यांना सभा घेण्यास नकार सुद्धा दिला गेला.

जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा 4 दिवस आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती समोर आली. त्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर आरक्षण देऊ, असा शब्द देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन मागे घेण्यास सांगितलं.

थोडक्यात बातम्या-