पोटात ना पाण्याच्या थेंब ना अन्नाचा कण; मनोज जरांगेंची तब्येत खालावली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालाना | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या पहील्या टप्प्यातील उपोषणाचा शेवटचा दिवस आहे. ते 29 ऑक्टोबरपासून दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरु करण्याआधीच त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांना थकवा जाणवत आहे. त्यांना बोलण्यासही त्रास होत आहे. ते डॉक्टारांकडूनही उपचार घेत नाहीत. त्यांनी दुसऱ्या उपोषणाच्या टप्प्यातील रुपरेषा सांगितली.

जरांगे पाटील म्हाणाले, उद्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात होईल. दुसरे उपोषण पाणी घेऊन करा. उद्या गावची गावं एकजुटीने एकत्र बसा. मोठ्या संख्येने मराठा समाज आमरण उपोषणाला बसणार आहे. हे देशातील मोठे आंदोलन असेल. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन 31 तारखेला ठरेल. आपल्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला यायचं नाही. आपणही कोणत्या राजकीय नेत्याच्या दारात जायचं नाही. आंदोलन शांततेत करा. कोणीच उग्र आंदोलन करु नका. उपोषणाला बसल्यानंतर कोणाच्या जिवाला धोका झाला तर त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार असेल. कोणीच आरक्षणसाठी आत्महत्या करु नका, असं अवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलं.

सरकारने आता गांभीर्याने घ्यावं. सकारने दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. नहीतर सरकार धोका देत आहे. त्यामळे मराठा समाज नाराज होईल. मला सरकारच्या वतीने फोन किंवा निरोप आला नाही. सरकारने सहजतेने घेऊ नये. अन्यथा सरकारला जड जाईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटलांची तब्येत जास्तच खालावली आहे. त्यांच्या प्रचंड अशक्तपणा आला आहे. त्यांना व्यवस्थित बोलताही येत नाही. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला आहे. अशातच त्यांनी दुसऱ्या टप्प्यातीत उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकार काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या