महिंद्रा आणणार सायकल, आश्चर्य म्हणजे घडी घालून नेता येणार!

मुंबई | IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी जगातील पहिली फोल्डेबल डायमंड फ्रेम ई-सायकल (Foldable diamond frame e-bike) तयार केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा या ई-सायकलचे चाहते झाले आहेत. आनंद महिंद्रा यांनी आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांच्या गटाने तयार केलेली ही सायकल लॉन्च केली.

आनंद महिंद्रा यांनी आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांच्या गटाने विकसित केलेल्या या सायकल स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. सायकल चालवतानाचे काही फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटोमध्ये आनंद महिंद्रा फोल्डेबल डायमंड फ्रेम ई-सायकल HORNBACK X1 चालवताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की ‘आयआयटी बॉम्बेतील काही लोकांचा आम्हाला पुन्हा अभिमान वाटला. त्यांनी पूर्ण आकाराच्या चाकांसह जगातील पहिली फोल्डेबल डायमंड फ्रेम ई-सायकल तयार केली आहे.

ही बाईक इतर फोल्डेबल बाइक्सपेक्षा 35% अधिक कार्यक्षम बनवते, बाईकला मध्यम ते उच्च वेगाने स्थिर ठेवण्याची क्षमता देखील यात आहे. ही एकमेव बाईक आहे जी फोल्ड केल्यानंतर उचलावी लागत नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .