‘अजित पवारांचा निर्णय योग्य…’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | राज्यात मराठा समाजाकडून आंदोलन सुरु आहे. एकीकडे जालनामधील अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी मान्य होत नाही तोपर्यंत राज्यातील अनेक गावांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राजकीय नेत्यांना बंदी घातली आहे. मराठा समाज आक्रमक झाला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन अजित पवारांनी बारामती दौरा रद्द केला आहे. अजित पवारांनी दौरा रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

मराठा समाजाची आरक्षणाबाबत काहीतरी भावना आहे, अशावेळी तिथे संघर्ष टाळणं, हे शहाणपणाचं लक्षण आहे. माझ्या मते अजित पवारांनी जो निर्णय घेतला, तो योग्य निर्णय होता, असं शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलंय. शरद पवार (Sharad Pawar) यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामती दौरा रद्द केल्यानंतर ते पुण्यातील शिवाजीनगर भागातील जिजाऊ निवासस्थानी दाखल झाले. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-