पोरीला घेऊन लॉजवर गेला, अन्… पुण्यातील प्रकारानं मोठी खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | संपूर्ण देशात आता सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात होत आहे. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलचा नाद लागला आहे. त्यातच सध्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मची जास्त क्रेज सुरु आहे. तर दुसरीकडे डेटींग अॅपच्या सुद्धा तरुण तरुणी आहारी गेले आहेत. मात्र हेच डेटिंग अॅप एका तरुणाच्या चांगलंच अंगलट आलंय.

पुण्यातील खराडीमध्ये घडलेल्या प्रकारानंतर अनेक जणांच्या भूवया उंचावल्या आहेत. डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली, त्यानंतर दोघांनी एकमेकांना विश्वासात घेतलं. यावेळी खराडी येथील एका हॅाटेलमध्ये दोघांची भेट देखील झाली. यावेळेस तिचा मित्रा सुद्धा तिच्यासोबत होता, मात्र यावेळी घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे.

नेमका काय आहे प्रकार?

डेटिंग अ‌ॅपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर तरुणी आणि तरुणाने एकमेकांचा नंबर शेअर करत टेलिग्रामवर चॅटिंग सुरु केली. त्यानंतर तिने त्याला भेटण्याकरिता रुम बूक करायला सांगितली. परंतु रुमवर भेटण्यासाठी गेले असता भलताच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

तरुण आणि तिच्या मित्राने तरुणाला मारहाण करत त्याचा मोबाईल जप्त केला आणि ऑनलाईन 20,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले. याबाबत कोणाला काही सांगितलं तर बलात्कारची केस दाखल करेन, अशी धमकीही दिल्याचा दावा तरुणाने केला आहे. याबाबत फिर्यादी तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास सुरू आहे.

थोडक्यात बातम्या-