मावळ | राज्यभरात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservration) प्रश्नाने पेट धरला आहे. आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे (Manoj jarange patil ) पाटलांनी आमरण उपोषण पुकारलं आहे. त्यांचं उद्या दुसऱ्या टप्प्यातील अंदोलन सुरूवात होणार आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात अनेक साखळी आंदोलनं चालू आहेत. मात्र अद्यापही राज्य सरकारने आरक्षणावर ठोस निर्णय घेतला नाही. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन (winter session) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील आमदाराने आक्रमक भूमिका घेतली आहे.
मराठा आरक्षणासाठी नेतेही आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh lanke) यांनी डिसेंबरमध्ये होणारं विधानसभेचं हिवाळी आधिवेशन बंद पाडण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्हात अनेक ठिकाणी साखळी उपोषणं सुरु आहेत. मावळमधील कार्ला गावात उपोषण सुरु आहे. त्या उपोषणाला निलेश लंके यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
जर मराठा समाजला आरक्षण मिळालं नाही तर, सर्व मराठा आमदार मिळून विधानसभेचे हिवाळी आधिवेशन बंद पाडू, असं वक्तव्य निलेश लंके यांनी केले. राज्यात अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. मात्र निलेश लंके यांना मराठा अंदोलकांनी विरोध केला नाही. त्यांनी तेथे सुरु असलेल्या आंदोलनाला भेट दिली.
राज्य सरकारमधील आमदारही आरक्षणासाठी आवाज उठवताना दिसत आहेत. भाजपचे आमदार संभाजी निलंगेकर (Sanbhaji nilngekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि राज्यात सुरु असलेल्या इतर अंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या–
- पोरीला घेऊन लॉजवर गेला, अन्… पुण्यातील प्रकारानं मोठी खळबळ
- ‘अजित पवारांचा निर्णय योग्य…’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
- “बलात्कार, लूटमार, दरोडे, सगळ्या गुन्ह्यांमध्ये मुस्लिम नंबर वन”
- देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडीओ कोणी व्हायरल केला? भाजपने सांगितलं कारण
- आता कुठलीच सासू सुनेला नकटी म्हणणार नाही, कारण…