मुंबई | महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Resrvation) विषय दिवसेंदिवस चिघळत चाललाय. मात्र सरकार अजूनही यावर तोडगा काढत नसल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे अॅड गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. यावेळी सदावर्ते यांनी प्रचंड संताप देखील व्यक्त केला होता. मात्र पुन्हा एकदा सदावर्तेंनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
अॅड गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे मराठा समाजाने आक्रमक होऊन त्यांची गाडी फोडली. त्यावर सदावर्ते म्हणाले, की मराठा आरक्षणाचा वाद उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी उभा केला आहे. येणाऱ्या काळात मराठा समाजातील बांधवांना कळेल की आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारणी आपली पोळी भाजत आहे. मराठा समाज आरक्षणात बसत नाही.
माला वाटतं की, मराठा समाजातील बांधवांनी मोठ मोठ्या पदावर जावं पण मागासवर्गीय होऊन जाण्याच्या भानगडीत पडू नये, असं सदावर्तेंनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की माझ्या गाड्यांची तोडफोड केली तर तुम्हाला आरक्षण मिळेल का? मला मारून टाकलं तर आरक्षण मिळेल का? तुम्हालाच आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. तुम्ही आरक्षण मागा पण जोर जबरदस्तीने केलेल्या मागणीला भारताचं संविधान मान्यता देत नाही.
थोडक्यात बातम्या-