आमदार आपत्रतेबाबत हालचाली वाढल्या; त्या ‘8’ आमदारांना नोटीस

मुंबई | शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर शिवसेनेतील आमदार आपत्रतेबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तारीख पुढे ढकलत असल्याने त्यांच्यावर विरोधी पक्ष नेते सातत्याने टिका करत आहेत.

सगळ्यांचं लक्ष सध्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीकडे लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीचं वेळापत्रक झाहीर केलं आहे. 30 ऑक्टोबरला हे नवं वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायलयाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दिल्लीला रवाना होण्याआधी राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना राहुल नार्वेकर म्हणाले की मी दिल्लीला चाललो आहे. पूर्वनियोजित हा दौरा आहे. त्यासाठी मी चाललो आहे. महाधिवक्त्यांचीही मी भेट घेणार आहे. कायदेशीर सल्ला घेऊन मी निर्णय घेईल.

राष्ट्रवादी बद्दल त्यांना प्रश्न विचारल्यवर राहुल नार्वेकर म्हणाले की, आमदार अपात्रतेची याचिका दाखल झाल्यानंतर ही नोटीस जाणं हा प्रक्रियेचा भाग आहे, असं नार्वेकर म्हणालेत.

दरम्यान, कालच राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना अपात्रता प्रकरणी नोटीस देण्यात आली. त्यानंतर आज राहुल नार्वेकर हे दिल्लीला जात आहेत.

महत्तवाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .