नारायण राणे यांच्याकडून मराठा कार्यकर्त्याला शिवीगाळ?

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांनी एका मराठा कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातोय.

नारायण राणे (Narayane Rane) संबंधित मराठा कार्यकर्त्याला शेवटी शिवीगाळ करतात, असं कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आहे. पण क्लिपमधील आवाज नारायण राणे यांच्यासारखाच येतोय. संबंधित क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोन करणारा मराठा कार्यकर्ता आपली ओळख रविंद्र मुटे अशी सांगतो. आपण छत्रपती संभाजीनगर येथून बोलतोय, असंही रविंद्र मुटे सांगतो. त्यानंतर त्याचा नारायण राणे यांच्यासोबत वाद होतो, असं कथित ऑडिओ क्लिपमध्ये समजत आहे. 

व्हायरल ऑडिओ क्लिपवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. नारायण राणे एवढे छोटे नेते नाहीत. नारायण राणेंबद्दल जे काही आले ते तपासून घेतलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

महत्त्वाच्या बातम्या-