आई आंदोलनस्थळी येताच मनोज जरांगे संतापले, हे आहे कारण!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला वारंवार इशारा देऊन सुद्धा सरकार यावर कोणतीच भूमिका घेत नसल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे.

मराठा आरक्षणासाठी जीवाचं रान करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. जरांगे पाटलांबरोबर राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण चालू आहे. पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही, शिवाय पाण्याचा एक घोटही नाही त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या अशक्त झाली आहे.

प्रकृती बघून आपल्या कुटुंबाला त्रास होईल त्यामुळे त्यांना आंदोलनास्थळी आणू नका, अशी विनंती त्यांनी केली. जरांगे यांच्या या विनंतीनंतरही त्यांच्या आईला आंदोलनस्थळी आणण्यात आलं, त्यामुळे ते अधिकच भडकले. त्यांनी आईला आंदोलनस्थळी आणणाऱ्यांना चांगलंच फटकारलं.

पाच दिवस अन्नपाण्याला न शिवल्यामुळे जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांना बोलतासुद्धा येत नाही. कुटुंबाला बघून हुंदका आवरणार नाही तसेच उपोषणावर परिणाम होईल म्हणून कुटुंबाला भेटण्यास ते नकार देत होते.

थोडक्यात बातम्या-