नवी दिल्ली | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे सुधारीत वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत आज न्यायालयात शिवसेनेच्या (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationlist congress party) आमदारांच्या अपात्रतेची एकत्रीत सुनावणी पार पडली. न्यायालयाने राहूल नार्वेकर यांनी सादर केलेलं नवं वेळापत्रकही फेटाळलं आहे. तसेच 31डिसेंबरपर्यंत सुनावणी घेऊन आदेश द्यावेत, असे निर्देश न्यायालयाने राहूल नार्वेकर यांना दिले आहेत.
राहूल नार्वेकर यांनी नवे सुधारीत वेळापत्रक न्यायालयात सादर केले. त्यानुसार फेब्रुवारी 29 पर्यंत सुनावणी घेण्यात येणार होती. त्यांनी सादर केलेल्या वेळापत्रकानुसार सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्यासाठी आणखी वेळ लागणार होता. त्यामुळे न्यायालयाने ते वेळापत्रक फेटाळलं.
शिवसेनेच्या आमदारांबाबत 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी घेऊन आदेश द्यावेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदरांची 31 जानेवारीपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
आम्ही निकाल देऊन बरेच दिवस झाले. तुम्हाला अनेक संधी दिल्या. मात्र तरीही तुम्ही निर्णय का घेतला नाही? पुढच्या निवडणूका येईपर्यंत हा गोंधळ असाच चालू ठेऊ शकत नाहीत, अशा शब्दात न्यायालयाने राहूल नार्वेकर यांना खडेबोल सूनावले. या वर्षाखेरीस शिवसेनच्या आमदारांचा अपात्रतेचा निकाल लागणार आहे. तर पुढील वर्षाच्या सुरूवातीला राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या–