“मराठा आरक्षणाचा विषय निघाला की अजितदादांना डेंग्यू झाला”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा समाजाकडून आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सहा दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतरही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काहीच निर्णय झाला नाही. दिवसेंदिव, मनोज जरांगेंची तब्येत खालावत चालली आहे. यावरून जरांगेंच्या मुलीने सरकारवर टीका केलीये.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मुलीने थेट अजित पवारांवर निशाणा साधला.

माझं कुटुंब माझ्यासमोर आणू नये असं आमच्या वडिलांनी सांगितलं आहे. आता याला सरकारच जबाबदार आहे. इतर जे कोणी उपोषण करत आहेत त्यांनी किमान पाणी तरी घेतलं पाहिजे, असं जरांगेंची मुलगी पल्लवीने म्हटलंय.

वडिलांची अवस्था पाहून आईची परिस्थिती वाईट झाली आहे. अजित पवार अंतरवलीत येणार होते. पण त्यांना आता डेंग्यू झाला आहे, बाकीच्या कार्यक्रमांना ते जातात पण मराठा आरक्षणासाठी म्हटले की लगेच आजारी पडतात, असं म्हणत पल्लवीने अजित पवारांवर टीका केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-